Advertisement

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

प्रजापत्र | Friday, 19/08/2022
बातमी शेअर करा

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी आल्याचा आरोप त्यांनी केला असून नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या धमक्या आल्याने राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

 

 

नेमके प्रकरण काय?
जे केले आहे त्यांचे परिणाम भोगावे लागतील, या आशयाचा मेसेज समीर वानखेडे यांना ट्विटरवर आला आहे. मेसेजमध्ये "तुमको पता नहीं तुमने क्या किया है, इसका हिसाब तुमको देना पड़ेगा. तुमको खत्म कर देंगे," असे लिहिले आहे. धमकीचा संदेश मिळाल्याने समीर वानखेडे यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. अमन नावाच्या टविटर अकाऊंटवरून धमकी मिळाल्याची माहिती समीर वानखेडे यांनी वृत्त माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ​​​

 

Advertisement

Advertisement