Advertisement

जम्मू काश्मिरात बिगर काश्मिरींनाही करता येणार मतदान

प्रजापत्र | Thursday, 18/08/2022
बातमी शेअर करा

जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या राज्यांतील नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदवता येईल. यासाठी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र सादर करण्याची कोणतीही गरज नाही, अशी घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी हृदेश कुमार यांनी गुरूवारी केली.

 

 

आयोगाने आपल्या दिशानिर्देशांत म्हटले आहे की, सुरक्षा दलांच्या जवानांनाही आपले नाव मतदार यादीत नोंदवता येईल. 2019 च्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये एकूण 78.7 लाख मतदार होते. लडाख विभक्त झाल्यानंतर जवळपास 76.7 लाख मतदार शिल्लक आहेत.

Advertisement

Advertisement