राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजप व निमलष्करी दलांवर गंभीर आरोप केलेत. 'महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व कर्नाटकातील सरकार कांद्या बटाट्यामुळे कोसळले नाही. यासाठी निमलष्करी दल व पोलिसांच्या ट्रकांमधून 2 नंबरचा पैसा भाजपच्या कार्यालयांत पोहोचवण्यात आला,' असे ते म्हणालेत.
गहलोत म्हणाले -हे काय करतात, हे तुम्हाला ठावूक आहे? हे आपली सरकारे असलेल्या राज्यांतील निमलष्करी दल किंवा पोलिसवाल्यांना हाताशी धरतात. त्यांचे ट्रक भरून हा पैसा भाजप कार्यालयात मागच्या दाराने पोहोचवतात. गाडी पोलिसांची असल्यामुळे तिला कुणीही पकडत नाही? लोकांना वाटते या गाड्या त्यांच्या मदतीला आल्या आहेत.
हे एक खूप मोठे षडयंत्र आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सत्य तुमच्यासोबत आहे, असे ते म्हणाले. गहलोत जयपूरमध्ये सोमवारी शहीद स्मारकाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
गहलोत म्हणाले -गोवा, अरुणाचल, कर्नाटक, मध्य प्रदेश व आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार काद्याबटाट्याने पडले नाही. तुम्हीच सांगा, मोदींनी नोटाबंदी कली. कॉमन सेन्सची गोष्ट आहे, 1000-500 च्या नोटा बंद करण्यात आल्या. या नोटांची जागा मोठ्या नोटांनी घेतली. कमी वेळेत अधिकाधिक पैसा इतरत्र पोहोचवण्यात यावा यासाठी 2 हजाराची नोट काढण्यात आली.