Advertisement

शेअर बाजाराचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे निधन

प्रजापत्र | Sunday, 14/08/2022
बातमी शेअर करा

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

१९८५ साली भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकिर्द सुरू केली होती. त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही एअरलाईन सुरू केली होती.

Advertisement

Advertisement