Advertisement

पाटोद्यानजीक अपघातात सहा जागीच ठार

प्रजापत्र | Sunday, 14/08/2022
बातमी शेअर करा

पाटोदा-येथून जवळच असलेल्या बामदळवाडी जवळ आयशर टेम्पो आणि कारच्या झालेल्या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असताना आता या सहा जणांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा जिल्हाभर शोककळा पसरली आहे.
    सर्व मयत व्यक्ती केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.आज सकाळी पुणे येथून गावाकडे येत असताना एक टेम्पोने कारला चिरडले आणि यात सहा जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. सध्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

Advertisement

Advertisement