Advertisement

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

प्रजापत्र | Friday, 12/08/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि. १२ (प्रतिनिधी ) : अल्पवयीन मुलीस पळवून नेट तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश . डी. डी. खोवे यांच्या न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला.

या प्रकरणातील आरोपी बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे, रा. वळसे वस्ती, ता. केज, जि. बीड याने अल्पवयीन पिडीत मुलगी मेंहदी क्लासला जात असताना आरोपीने तीस बळजबरीने पळवून नेवूनतिला पूणे येथे एक महिना ठेवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणाचा तपास पो. निरीक्षक आर. जी. गाडेवाड यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. रामेश्वर एम. ढेले व त्यांना मार्गदर्शन वरीष्ठ सरकारी वकील अॅड. अशोक व्ही कुलकर्णी यांनी केले आणि अॅड. नितीन पुजदेकर यांनी मदत केली व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के , आर. एम. ढेले सहा. सरकारी अभियोक्ता, अंबाजोगाई यांनी काम पाहिले

Advertisement

Advertisement