Advertisement

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा

प्रजापत्र | Wednesday, 10/08/2022
बातमी शेअर करा

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरु असताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने-सामने असून पक्षाचं चिन्ह मिळावं यासाठी संघर्ष सुरु आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

 

 

महाराष्ट्र विधीमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवेसना पक्षास अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसंच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 

Advertisement

Advertisement