Advertisement

किरीट सोमैया आणि मुलगा नील सोमैयाला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

प्रजापत्र | Wednesday, 10/08/2022
बातमी शेअर करा

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमैया यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. किरीट सोमैया यांनी 2014 साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत जवळपास 58 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमैया यांनी लाटली, असा आरोप करण्यात आला. याच प्रकरणात त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
 

Advertisement

Advertisement