Advertisement

पुरावे सादर करण्यासाठी निवडणुक आयोगाकडून 4 आठवड्यांची मुदत

प्रजापत्र | Tuesday, 09/08/2022
बातमी शेअर करा

मुंबई :  शिवसेनेतील बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच दुसरीकडे (Central Election Commission) केंद्रीय निवडणुक आयोगाने पक्षासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश (Eknath Shinde) शिंदे गटाला आणि शिवसेनेला दिले होते. मात्र, यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्याला निवडणुक आयोगाने ग्रीन सिग्नल दिला असून आता यासंदर्भातील पुरावे 4 आठवड्यात सादर केले तरी चालणार आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून त्याअनुशंगाने सुरु असलेल्या प्रक्रियेला पुरेसा वेळही मिळणार आहे. सोमवारी मुदतवाढीच्या अनुशंगाने अर्ज करण्यात आला होता. आगामी चार आठवड्यातील शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेला पुरावे सादर करता येणार आहेत.
 

Advertisement

Advertisement