Advertisement

संजय राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

प्रजापत्र | Monday, 08/08/2022
बातमी शेअर करा

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना  दिसत नाहीयेत. त्यांच्या ईडी (ED) कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज तरी संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 31 जुलै रोजी ईडीचं एक पथक  संजय राऊत  यांच्या निवासस्थानी चौकशी साठी दाखल झाले होते. पत्रा चाळ प्रकरणात  त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले व ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

Advertisement

Advertisement