Advertisement

देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री!

प्रजापत्र | Sunday, 07/08/2022
बातमी शेअर करा

राज्यात सत्तांतर होऊन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटला असला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेले नाही. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. हे अवघ्या देशाला माहीत असून, मात्र सर्च इंजिन गुगलला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे अद्याप माहिती नाही. आता तुम्ही म्हणत असाल हे कसे शक्य आहे. तर तुमच्या मनात आलेला प्रश्न शंभर टक्के खरा आहे. मात्र, गुगलवर तुम्ही 'देवेंद्र फडणवीस' असे सर्च केले असता गुगल रिझल्टवर फडणवीस हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचे दाखवण्यात येत आहे. गुगलकडून काहीतरी चूक झाल्याने हा प्रकार घडला असावा. या चुकीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.
 

Advertisement

Advertisement