राणे कुटुंबीय आणि दिपक केसरकरांमधील वाद येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. दिपक केसरकरांना ट्विट करुन थेट ड्रायव्हर पदाची ऑफरच त्यांनी देऊन टाकली आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे. असे म्हणत केसरकरांना नारायण राणेंवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असले तरी राणे-केसरकरांमधील वाद विरोधकांना चांगलीच संधी मिळवून देत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांच्या मुलांबाबत मी कोणतेही वक्तव्य केले की, ते आमच्या पूर्वीच्या वादाशी जोडले जाते. नकळत वक्तव्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी आता यापुढे पत्रकार परिषदेत कधीही राणेंचे नाव घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. भाजप व शिंदे गटात वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करणे, यापुढे टाळणार असल्याचेही केसरकर म्हणाले. मात्र राणेंनी थेट ड्रायव्हरची नोकरी देतो असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. केसरकरांकडून राणेंना आता कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.