Advertisement

वाघळूजजवळ खाद्यतेलाचे टँकर पलटी

प्रजापत्र | Thursday, 04/08/2022
बातमी शेअर करा

प्रविण पोकळे

आष्टी-नगरहून-जामखेड येणारे कच्चा खाद्य तेलाचे टँकर आज सायंकाळी 7 च्या दरम्यान वाघळूजजवळ पलटी झाल्याची घटना घडली आहे. टँकर पलटी झाल्याने तेल रस्त्यावर सांडू लागल्यानंतर परिसरातील गावच्या नागरिकांनी तेल भरण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

    आज सायंकाळी 7 च्या दरम्यान नगरहून-जामखेड येणारे कच्चा खाद्य तेलाचे टँकर (MH. 04.GF 2677) वाघळूजजवळ भरधाव वेगात असल्याने पलटी झाले. यामुळे रस्त्यावर टँकरमधील तेल ओसंडून वाहत होते. यावेळी परिसरातील गावकऱ्यांनी तेल घरी घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान हे तेल कच्चे असून ते खाण्यास योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या टँकरमधील तेल ज्यांनी आपल्या घरी नेले आहे त्यांनी याचा उपयोग खाण्यासाठी करू नये असे आवाहन ही करण्यात येत आहे. दरम्यान या सर्व प्रकारची सध्या आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

Advertisement

Advertisement