Advertisement

खासगी रुग्णालयात अग्नितांडव

प्रजापत्र | Monday, 01/08/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : जिथे रुग्णांचे उपचार सुरू होते जिथे जगण्याची आशा होती तिच आशा आगीत होरपळली. एका खासगी रुग्णालयात भीषण अग्नितांडव झाला. आगीची माहिती मिळताच तातडीनं 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही. 

 

 

मध्य प्रदेशातील जबलपूरमधील दमोह नाका परिसरात असलेल्या न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला भीषण आग लागली. या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

आगीमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.  या आगीत दोन जण गंभीर जखमी आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 

Advertisement

Advertisement