Advertisement

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामकरणालाही उच्च न्यायालयात आव्हान

प्रजापत्र | Monday, 01/08/2022
बातमी शेअर करा

औरंगाबादनंतर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. मात्र दोन्ही याचिकांवर न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी ठेवली.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्याच्या निर्णयाला गेल्याच आठवड्यात आव्हान देण्यात आले होते. आज (सोमवार) या याचिकेवर सुनावणी होणार होती. परंतु न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठासमोर उस्मानाबादच्या नामकरणाबाबतची याचिका सादर करण्यात आली. त्यानंतर दोन्ही याचिकांवर आजच सुनावणी घेण्याची किंवा याच आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली.त्यावर या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
 

Advertisement

Advertisement