मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावमध्ये पोहचले. आज कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घराची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली.
एकनाथ शिंदे म्हणाले म्हणाले की, पोलिसांच्या घराच्या बाबतीत मी बैठक घेतली आहे. पोलिसांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे मला कळाले. जुन्या वसाहती असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पोलिसांसाठी घराची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावरची बैठकही घेतली. रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला घराची चिंता असता कामा नये. घराची चिंता नसल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते.
बातमी शेअर करा