Advertisement

BSNLला मिळणार नवसंजीवनी:1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

प्रजापत्र | Wednesday, 27/07/2022
बातमी शेअर करा

केंद्रीय मंत्रिमंडळाने BSNL साठी 1.64 लाख कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पॅकेजमध्ये तीन मुख्य घटक असतील, बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल, त्याचा वापर तोटा कमी करण्यासाठी होईल आणि कंपनीची फायबर पोहोच वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल, अशीही माहिती वैष्णव यांनी दिली. या पॅकेजनंतर BSNL एआरपीयू 170-180 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी 4G सेवांचा विस्तार करू शकेल, असेही वैष्णव यांनी सांगीेतले.

 

 

केंद्र शासनाच्या वतीने BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी 1 लाख 64,156 कोटी रुपयांचे विशेष निधी मंजूर केला आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणाला देखील मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट समिती (CCEA) मध्ये मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

 

 

BSNL-BBNL विलीनीकरण
केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली. या विलीनीकरणामुळे BSNL कडे आता देशभरात पसरलेल्या BBNL च्या 5.67 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे संपूर्ण नियंत्रण असणार आहे. आगामी तीन वर्षात बीएसएनएलसाठी 23 हजार कोटी रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्याचवेळी, सरकार एमटीएनएलसाठी 2 वर्षांत 17,500 कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

 

 

उत्तम सेवेसाठी विशेष पॅकेज
बीएसएनएल (भारत संचार निगम लिमीटेड) कंपनीच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विशेष पॅकेज जाहीर केले. त्यामुळे येत्या काळात बीएसएनएलची सेवा अधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून बीएसएनल सेवेबाबत ग्राहकांकडून तक्रारी वाढलेल्या आपणास दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जात्मक सेवा देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने हे विशेष पॅकेज देण्यात आले.

 

 

एका दृष्टीक्षेपात विशेष पॅकेजचा आढावा
बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट असेल. त्याचा ताळेबंद कमी करण्यासाठी वापरला जाईल.
कंपनीची फायबर पोहोच सेवा वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
पॅकेजनंतर, BSNL एआरपीयू 170-180 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी 4G सेवांचा विस्तार करू शकणार आहे.
BSNL साठी 4G आणि 5G सेवांच्या स्पेकट्रमला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

 

BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण
केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, सरकारने बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला 4G वर अपग्रेड होण्यास मदत होणार आहे. BSNL चे 6.80 लाख किमी पेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. त्याचवेळी BBNL ने देशातील 1.85 लाख ग्रामपंचायतींत 5.67 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकले आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (USOF) द्वारे BBNL ने घातलेल्या फायबरचे नियंत्रण BSNL ला मिळणार आहे.

Advertisement

Advertisement