मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज टाटा (Tata) उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. टाटा यांची सदिच्छा भेट घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी रटन टाटा यांची त्यांच्या कुलाब्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी रतन टाट यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मी रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा