Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेत वाढ

प्रजापत्र | Wednesday, 27/07/2022
बातमी शेअर करा

सुरक्षा नाकारल्याच्या आरोपांनतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे.युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतंय. रस्त्यालगत बंगला असल्याने आतील हालचाली दिसू नयेत, यासाठी बंगल्याला चहूबाजूने कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या नंदनवन बंगल्यातच (Nandan Bungalow) राहत आहेत. पुढेही इथेच राहणार असल्याची माहीती मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी देण्यात येणाऱ्या वर्षा बंगल्यावर ते राहायला जाणार का? हा प्रश्न अनुत्तरित राहातो.

 

 

सुरक्षा वाढवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नंदनवन बंगल्याला 10 फूट उच भिंतीचं कुंपण घालण्यात येतंय. पुढील पाच दिवस हे काम चालणार आहे.युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे कुंपण घालण्यात येतंय. रस्त्यालगत बंगला असल्याने आतील हालचाली दिसू नयेत, यासाठी बंगल्याला चहूबाजूने कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 

Advertisement

Advertisement