ऑगस्ट तसा तर क्रांतीचा महिना. देशाने या क्रांतीपर्वातच स्वातंत्र्य मिळवलं आणि गेल्या 75 वर्षांपासून देश ते स्वातंत्र्य उपभोगत आहेत. देशातील नियमात, कायद्यात अनेक बदल झाले आहेत. आता 1 ऑगस्टपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत (LPG gas Cylinder)नव्याने ठरवण्यात येणार आहे. तर ऑगस्ट महिन्यांत भरमसाठ सुट्यांचा पाडाव (Bank Holidays) आहे. या महिन्यांत अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. एवढेच नाही तर बँक ऑफ बडोदा (BOB)त्यांच्या धनादेशाविषयीच्या नियमात बदल करणार आहे. तसेच बँका व्यवहाराच्या (Cash Transaction)नियमांत काही बदल करण्याची शक्यता आहे. या बदलांचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या तर तुमचा खिसा खाली होईल तर कमी झाल्या तर तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्ही बँक ऑफ बडोद्याचे ग्राहक असाल तर धनादेशाविषयीचे नियम माहिती असणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तसेच सुट्यांच्या दिवशी बँकेत जाण्याचे परिश्रम ही बातमी वाचल्यावर टळतील.
धनादेशाचे काय बदलले नियम
1 ऑगस्टपासून बँक ऑफ बडोद्याचे (BOB) धनादेशाचे नियम बदलले जातील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बँक करणार आहे. बँक ऑफ बडोद्याने त्याअनुषंगाने धनादेश व्यवहारांचा नियम बदलणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाच लाख रुपयांच्या वरील आर्थिक व्यवहारांसाठी बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Positive Pay System) लागू केली आहे. धनादेश देणाऱ्याला बँक आता धनादेश व्यवहाराची विषयीची अद्ययावत माहिती एसएमएस, नेटबँकिंग, मोबाईल अॅपद्वारे देईल. त्यामुळे धनादेश व्यवहाराच्या फसवणुकीचे प्रकार होणार नाही.
काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टिम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील फसवणूक टाळण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी 2020 पासून धनादेशासाठी केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरु केली आहे. या सिस्टिममुळे 50,000 आणि त्यावरील अधिकच्या पेमेंटसाठी नुकसान टाळण्यास येणार आहे. सिस्टिमनुसार, SMS,बँकेचे मोबाईल अॅप वा एटीएमद्वारे धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाविषयीची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. धनादेशाविषयी ही माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य वाटल्यावरच धनादेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.
घरगुती गॅसच्या किंमती
दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती गॅसच्या किंमती ठरवण्यात येतात. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून हे भाव कमी जास्त होऊ शकतात. सरकारी तेल उत्पादक कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती ठरवतात. गेल्यावेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा गॅसच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.