Advertisement

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी स्वाक्षरी मोहीम

प्रजापत्र | Monday, 25/07/2022
बातमी शेअर करा

उस्मानाबाद : राज्यातील अनुसूचित जाती, जमाती ,ओबीसी , धार्मिक अल्पसंख्याकांसह सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना अद्यापही मागील वर्षीची शिष्यृवत्ती देण्यात आली नाही. या विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती चे वितरण करावे या साठी उस्मानाबाद येथील जागृती फाउंडेशन ने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. 

 

       

       मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारने शिष्यवृत्ती ची योजना राबविली जाते. परंतु राज्य व केंद्र सरकार च्या विलंबामुळे ही शिष्यवृत्ती मागील वर्षा पासून मिळालेली नाही. मागील वर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षण , भोजन , निवास , वाहतूक यासाठी पदरमोड व उधार उसनवारी करून शिक्षण घेतले आहे. मागील वर्षी ची शिष्यवृत्ती न मिळाल्याने या विद्यार्थ्यां समोर या वर्षी पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. 

 

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) च्या वतीने अनुसूचित जातीतिला इयत्ता 10 वीत 90 टक्के हुन अधिक गुण मिळाल्यास 2 लाख रुपये शिष्यवृत्ती घोषित केलेली रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. या वर्षी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी संकेत स्थळ सुरू करण्यात आले नाही. मागील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन या वर्षीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तात्काळ संकेतस्थळ सुरू करावे अशी मागणी केली आहे. 

 

      मागील काही वर्षा पासून राज्य सरकारने अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना

महानगरपालिका व नगर पालिके च्या वर्गवारी नुसार शिष्यवृत्ती देण्यात येते. ती मागील दोन वर्षापासून वितरित करण्यात आली नाही.

 

  मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांसाठी जागृती फाउंडेशन उस्मानाबाद च्यावतीने 25 ते 28 जुलै या कालावधीत शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. स्वाक्षरी मोहिमेची सुरूवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ सरवदे,संभाजी कांबळी व जागृती फौंडेशनचे अध्यक्ष विजय अशोक बनसोडे यांच्यासह शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी केली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 

 यावेळी मुकेश मोटे,बाबासाहेब कांबळे, सोहनभाऊ बनसोडे,आण्णा बनसोडे,हिम्मत शिंगाडे,अतुल लष्करे,प्रभाकर सोनवणे, यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement