Advertisement

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

प्रजापत्र | Sunday, 24/07/2022
बातमी शेअर करा

परळी दि. २४ (वार्ताहर)-भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा २६ जूलै रोजी वाढदिवस असून यानिमित्त भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, गरजू महिलांचा दहा लाखाचा विमा, शिलाई मशीन वाटप करण्यात येणार आहे. 

 

 

 

          पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रविवारी (दि.२४) पार पडली. शहर व तालुक्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आपला वाढदिवस समाजातील वंचित, पिडित घटकांची सेवा करून साजरा करावा असं आवाहन पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे, त्यानुसार शहर व ग्रामीण भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, गरजू महिलांना शिलाई मशीन, भारतीय डाक विभागाचा दहा लाखांचा अपघात विमा, दंतरोग चिकित्सा, रक्तदान शिबीर, रूग्णांना फळ आणि ब्लॅकेट वाटप, प्रभू वैद्यनाथ आणि कपीलधार तीर्थक्षेत्री अभिषेक, दर्ग्यास चादर आदी उपक्रम यावेळी राबविण्यात येणार आहेत. जिल्हाभरात देखील अशाच सामाजिक उपक्रमांनी पंकजा मुंडेंचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement