Advertisement

ट्रक दरीत कोसळून दोघे ठार

प्रजापत्र | Sunday, 24/07/2022
बातमी शेअर करा

पाटोदा दि.२४ (वार्ताहर)नगर महामार्गावर असलेल्या महेंद्रवाडीच्या घाटात रेल्वेचे सामान घेऊन जाणारी ट्रक अवघड वळणावर शनिवारी रात्री आठच्या सुमारास पलटी झाल्यामुळे ट्रक खोल दरीत कोसळला.यात निखील दहिफळे (वय-१८ रा.खडकवाडी ता.पाटोदा) व नानासाहेब सानप (वय-२१ खडकवाडी ता.पाटोदा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने खडकवाडी येथे शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिस ठाण्याचे पीएसआय पतंगे , पोलिस कर्मचारी संभाजी सोळंके , काकडे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली होती.

         पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या महेंद्रवाडीच्या घाटात दौंडकडून येणारा ट्रक (एम.एच.२३ डब्लू २६८३) हा आला असता ट्रक चालकाला कॉर्नरचा अंदाज न आल्यामुळे सदरिल ट्रक खोल दरीत कोसळला. या ट्रक मधील निखील दहिफळे व नानासाहेब सानप यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झालेला ट्रक हा सावरगाव येथील असल्याचे कळते ट्रक मधील मयत झालेले दोन्ही युवक हे अविवाहीत होते .

Advertisement

Advertisement