Advertisement

ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे निधन

प्रजापत्र | Friday, 22/07/2022
बातमी शेअर करा

ज्येष्ठ लेखक, कांदबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज (२२ जुलै) पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. मराठी साहित्यातील विविध प्रांतात मोलाची भर घालणारे खरे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीचा पुरस्कार करणारे लेखक म्हणून ओळखले जायचे. ‘अंताजीची बऱखर’, ‘उद्या’, ‘बखर अंतकाळाची’ या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय झाल्या. मानवाच्या जडणघडणीचा साद्यंत अभ्यास करून त्यांनी सिद्ध केलेला ‘कहाणी मानवप्राण्याची’ हा ग्रंथ त्यांच्या वैचारिक लेखनाची ओळख घडवणारा ठरला आहे.पुणे महापालिका निवडणुकीत १०० प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार : जगदीश मुळीकनंदा खरे यांनी वृत्तपत्रीय लेखनही विपुल प्रमाणात केले आहे. वैचारिक भूमिकेशी ठाम राहून कोणतीही तडजोड न करता लेखन करणारा साहित्यिक अशीच त्यांची ओळख आहे.
 

Advertisement

Advertisement