आष्टी दि.22 जुलै – आष्टी तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात बिबट्याचे दर्शन नागरीकांना होत आहे. बिबट्याने काही दिवसांपुर्वीच आंबेवाडी येथील शेतकऱ्याच्या शेळीचा फाडशा पाडला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले असून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
आष्टी (Ashti) तालुक्यात बिबट्या (Leopard) दिसून आल्याच्या चर्चेनंतर तालुक्यातील आंबेवाडी येथे शेळीची शिकार झाली होती. यानंतर वनविभागाने केलेल्या पाहणीत बिबट्याचे ठसे वनविभागाला आढळून आले. वन विभागाकडून (Forest Department) तो नरभक्षक बिबट्या नसून तो मानसाळलेला आहे. यामुळे मानवी वस्तीला धोका नसल्याचे सांगितले. मागिल 2 ते 3 महिन्यात अशी घटना घडली नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता रात्री अपरात्री बाहेर न फिरणे लहान मुलांना लक्ष ठेवणे व सतर्क राहण्याचे आवाहन आष्टी तालुका परिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी केले आहे.
बुधवारी (दि.20) रात्री मुगगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी हे गावाकडे जात असताना नागरीकांना बिबट्याचे दर्शन झाले,त्याचे फोटो सोशल मिडिया वर व्हायरल झाले आहेत. यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात डोंगर रांग असल्याने मागिल काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन सातत्याने नागरीकांना होत आहे. यातच आंबेवाडी येथील शेतकऱ्यांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार केली आहे.मात्र नागरिकांना सतर्क राहावे.