Advertisement

जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार

प्रजापत्र | Friday, 22/07/2022
बातमी शेअर करा

जगातील पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्यात यश आले आहे. जगातील तीन देशांमध्ये ही लस लागू करण्याची तयारी सुरु झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगातील तीन आफ्रिकन देशांमध्ये तयार केलेली पहिली मलेरियाविरोधी लस तयार करण्याची घोषणा केली आहे. 

 

 

GlaxoSmithKline (GSK) ने बनवलेली 'Mosquirix' नावाची लस सुमारे 30 टक्के प्रभावी आहे आणि त्यासाठी 4 डोस आवश्यक आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने ही लस तयार करण्यासाठी 200 मिलियन डॉलरचा मोठा निधी दिला होता. डब्ल्यूएचओने या लसीला मलेरियाविरुद्धच्या लढ्यात ऐतिहासिक यश म्हटले आहे. मात्र, आता त्याची महागडी किंमत पाहता ते लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेतून फाऊंडेशनने माघार घेतली आहे. फाउंडेशनने या आठवड्यात असोसिएटेड प्रेसला सांगितले की ते यापुढे लसीसाठी निधी देणार नाही. 
 

Advertisement

Advertisement