Advertisement

आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली

प्रजापत्र | Thursday, 21/07/2022
बातमी शेअर करा

जवळपास अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. तसेच, हे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली होती. मात्र, आता हा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरवला असून आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरची स्थगिती त्यांनी उठवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

 

 

राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचे २५ टक्के कामही पूर्ण झाले होते. मात्र, नोव्हेंबर २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद उच्च न्यायालयात गेला आहे.
 

Advertisement

Advertisement