गेवराई : दोन गटात झालेल्या किरकोळ भांडणातून एका 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचा प्रकार गेवराई शहरातील संजयनगर भागात घडला आहे. बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे शहरात खळबळ माजली आहे. बाबु शेलुरे हे मयत तरुणाचे नाव आहे.
गेवराईच्या संजयनगर भागात रहात असलेल्या बाबु शिवराम शेलुरे (वय24) या तरुणाचे काही लोकांसोबत वाद झाले होते. त्याच वादातून तिघांनी बुधवारी सायंकाळी बाबु याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यु झाला. या भांडणामागचे नेमके कारण अजून समोर आले नाही. पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा शोध सुरु आहे.
बातमी शेअर करा