पुणे-महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये २७% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे, या निर्णयाचे
वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी स्वागत केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालासह ट्रिपल टेस्ट व अन्य बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून, ओबीसींच्या २७% पर्यंत मर्यादेतील आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केला आहे.आज या निकालाचा आनंद आहे, व्यक्तिगत रित्या मी या निकालाचे स्वागत करतो, असेही वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी म्हटले असून या निकालामुळे ओबीसीना मोठा दिलास मिळाला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.