दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तापेचावरील सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला असून आता पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तापेचावरील शिवसेना, बंडखोर आणि इतरांच्या याचिकांवर बुधवारी सरन्यायाधिशांसमोर सुनावणी सुरू झाली. यात सर्वच बाजुंना आपली बाजू मांडण्यासाठी पुढील बुधवारचा वेळ देण्यात आला असून याचिकेची सुनावणी आता १ ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी कदाचित ५ सदस्यीय पिठासमोर होऊ शकते.
बातमी शेअर करा