Advertisement

कोरोनाच्या नियमांचे पालन करुन नीट यूजी परीक्षा पार

प्रजापत्र | Sunday, 17/07/2022
बातमी शेअर करा

देशभरात नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET ची परीक्षा आज पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल 18 लाख विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. कोरोनाच्या नियमावलींचे पालन करुन ही परीक्षा घेण्यात आली होती. आज दुपारी 2 ते 5.20 या दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. 

 

 

यूजी नीट (NEET-UG 2022) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केलं गेलं होतं. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा घेण्यात आली. 

 

 

नीट यूजीच्या परीक्षेची अन्सर की लवकरच पब्लिश करण्यात येणार आहे. नीट परीक्षा 91,415 मेडिकल, 26,949 डेंटल, 52,720 आयुष आणि 603 पशुवैद्यकीय जागांसाठी घेण्यात आली. बीएससी नर्सिंग आणि लाइफ सायन्स अभ्यासक्रमांसाठीही नीट (NEET) स्कोअरचा उपयोग होणार आहे.

 

 

देशभरातील 546 शहरांमध्ये परीक्षा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) ही परीक्षा देशभरातील 546 शहरांमध्ये आणि देशाबाहेरील 14 शहरांमध्ये घेण्यात आली.

 

 

विद्यार्थीनींची संख्या 10 लाखांहून जास्त
आज झालेल्या नीट परीक्षेसाठी 10 लाखाहून जास्त विद्यार्थींनी बसल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 2.57 लाखांनी जास्त आहे. 

 

 

85 टक्क्यांच्या वर कट ऑफची शक्यता 
एकूण 13 भाषांमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी 85 टक्क्यांच्या वर कट ऑफ लागण्याची शक्यता असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. 
 

Advertisement

Advertisement