941 कोटींच्या नगर विकास विभागांच्या कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल 245 कोटींची कामे ही बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार होती. यामुळे हा विरोधी पक्षनेते अजित पवारांना धक्का मानला जात आहे. असे असताना मात्र शिवसेनेच्या आमदारांना सॉफ्ट कॉर्नर देण्यात आला आहे.
मार्च 2022 ते जून 2022 या काळात मविआ सरकारने हा निधी मंजूर केला होता. मात्र, आता अजित पवारांच्या मतदारसंघात कामांना ब्रेक लागणार आहे. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना मंजूर झालेला निधीलाही स्थगिती दिली आहे. शिंदे सरकारने यापूर्वीही अशी भूमिका महानगरपालिकेच्या निधी संदर्भात घेतली होती.
बातमी शेअर करा