पुणे : कायदा आणि सुव्यवस्था याबाबत प्रश्न चिन्ह उभा करणाऱ्या घटना पुण्यात घडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. अज्ञात शंभर जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयता, तलवारी आणि सिमेंटच्या ब्लॉकने १० वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी निलेश जाधव यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाने १२ वाहनांची तोडफोड केली होती.
जितेश मंजुळे, आशिष जगधाने, इरफान शेख, आकाश हजारे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेत १०० जण सहभागी असल्याचं तक्रारीत म्हटलं असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहे. पिंपरीत रात्री उशिरा दोन गटात किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानुसार दुसऱ्या गटातील १०० जणांचे टोळके दुसऱ्या गटाला मारण्यासाठी गेले. मात्र तो न भेटल्याने २१ दुचाकीवरून आलेल्या आणि स्थानिक अशा एकूण १०० जणांनी तलवारी आणि कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, मात्र नेहरू नगरमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. आरोपींवर कठोर कारवाई करू असे पोलीस उपायुक्त इप्पर यांनी सांगितले आहे.
प्रजापत्र | Saturday, 31/10/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा