Advertisement

शिवसेनेच्या आमदाराचा ईस्टर्न फ्रीवेवर अपघात

प्रजापत्र | Monday, 11/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सध्या राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, आज आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात झाला आहे. गोगावलेंच्या गाडीला मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर अपघात झाला

 

 

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावलेंच्या गाडीला आज अपघात झाला.  एकापाठोपाठ 8 गाड्या एकमेकांना धडकल्याने गोगावलेंच्या गाडीचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.

Advertisement

Advertisement