Advertisement

अनिल देशमुखांना कोर्टाचा दणका

प्रजापत्र | Monday, 11/07/2022
बातमी शेअर करा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन कोर्टानं नाकारलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CBI Court) फेटाळला. अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का देशमुखांना मानला जातोय. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयनं पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पुढे ईडीनं याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर आजपर्यंत देशमुख कैदेतच आहे.
 

Advertisement

Advertisement