Advertisement

अमरनाथ गुफेजवळ ढगफुटी

प्रजापत्र | Friday, 08/07/2022
बातमी शेअर करा

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान घडली आहे. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी 10 ते 15 हजार भाविक गुहेजवळ उपस्थित असल्याचे बोलले जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी केवळ दोन जणांचे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

 

 

अमरनाथ गुहेपासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर ही ढगफुटीची घटना घडली आहे. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचे प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले सुमारे 25 तंबू आणि दोन लंगर वाहून गेले. पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेकांच्या सामानाचे नुकसान झाले. घटनेनंतर लगेचच जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने लष्कर, आयटीबीपी, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य सुरू केले. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले जात असून त्यांना छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे.
 

Advertisement

Advertisement