मुंबई - सीबीआयनं मुंबई पोलीसचे माजी आयुक्त संजय पांडे आणि एनएसईच्या सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संजय पांडे यांच्यावर घरावरही छापा टाकला आहे. १९८६ बॅचमधील आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता.
३० जूनला संजय पांडे सेवानिवृत्त झाल्यानंतर ईडीनेही त्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं होते. आता सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संजय पांडे आणि चित्रा रामकृष्ण यांनी एक ऑडिट कंपनी स्थापन केली होती. २०१८ पासून सीबीआय एनएसई स्कॅमचा तपास करत आहे. २००९ ते २०१७ या काळात शेअर मार्केटमधील कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याप्रकरणी सीबीआयनं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बातमी शेअर करा