मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार अनुपस्थित होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.
विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने घेतली होती. मात्र, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार विलंबाने पोहोचले. त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते.
बातमी शेअर करा