Advertisement

रोजच्या जेवणातील वस्तूंवर सुद्धा लागणार जीएसटी

प्रजापत्र | Thursday, 07/07/2022
बातमी शेअर करा

रोजच्या जेवणातील गहू, तांदूळ , ज्वारी , डाळी , दही, ताक वगैरे पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लावण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलने केली आहे . 18 जुलैला याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक व्यापारी संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. राज्यातील दीडशे व्यापारी संघटनांची परिषद शुक्रवारी या विरोधात पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. 

 

 

२८ आणि २९ जूनला चंदीगडमध्ये झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीत अनेक वस्तूंवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या बैठकीतील सर्वात महत्वाची शिफारस आहे ती म्हणजे रोजच्या जेवणातील धान्य , कडधान्य , दही , ताक , लोणी यासारख्या वस्तूंवरती 5 टक्के जीएसटी लागू करण्याची. 

Advertisement

Advertisement