Advertisement

पीटी उषा, इलयाराजा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर निवड

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली आहेत. ही चारही नावं दक्षिण भारतातली आहेत. धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलयाराजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद, वीरेंद्र हेगडे यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे कथालेखक आहेत.

 

 

पीटी यांच्याबद्दल ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पीटी उषा त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात, परंतु नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.
 

Advertisement

Advertisement