नवी दिल्ली-केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची टर्म उद्या संपणार असल्याने त्यांनी आज पंतप्रधानांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीमाना सुपूर्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातंय. मुख्तार अब्बास नकवी हे भाजपचा अल्पसंख्याक विभाग सांभाळत असून त्यांना आता मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार किंवा राज्यपालपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्तार अब्बास नकवी हे आजच्या त्यांच्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सामिल झाले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केलं. केंद्रीय स्टील मंत्री आरसीपी सिंह यांचीही आजची शेवटची कॅबिनेट बैठक होती. या दोन्हील मंत्र्यांना निरोप देताना त्यांचे योगदान हे कायम लक्षात राहिल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केलं. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेची टर्म 7 जुलै रोजी संपत आहे.
बातमी शेअर करा