Advertisement

उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यात झटका:मुंबईत शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा राजीनामा

प्रजापत्र | Wednesday, 06/07/2022
बातमी शेअर करा

शिवसेना पक्षप्रमूख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता मुंबईतही धक्के बसू लागले आहेत. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शाखा क्रमांक 3 चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी पदाचा राजीनामा देऊन जोरदार धक्का दिला आहे. तर दुसरीकडे पक्षातील पडझड रोखण्यासाठी शिवसेनेकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
 

Advertisement

Advertisement