उपमुख्यमंत्री होण्यात कमीपणा नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. पक्षाने त्याला मान्यता दिली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
शिवसेना आमदारांचे बंड नव्हे तर उठाव होता. शिवसेना आमदारांची खदखद पहिल्या दोन महिन्यांत लक्षात आली होती. मी त्यावर नजर ठेवून होतो असे फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनच्या जोरावर बाकीचे पक्ष स्वत:चे राजकीय प्राबल्य वाढविण्यायाठी प्रयत्न करत होते.या सर्व अस्वस्थतेत त्यांनी उठाव केला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली.
बातमी शेअर करा