मी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत बसलेल्या तिघांना कोणाला मुख्यमंत्री बनवले जाणार हे माहीत होते. मी मुख्यमंत्री होणार नाही याची मला आधीच माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यांतर मला उपमुख्यमंत्री करण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासाठी आश्चर्यचा धक्का होता, अशी कबुली राज्याचे नवनिर्वाचित उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते वृत्त वाहिनींशी बोलत होते.
आमचे सरकार आता कोणत्याही परिस्थितीत पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. त्याचा मंत्रिमंडळ विस्तारावर काहीही परिणाम होणार नाही. राजकीय कारणांमुळे आपण मंत्रिमंडळाचा विस्तार थोडा मागे-पुढे करू शकतो. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.