Advertisement

पाण्याच्या शोधात भटकंती करणार्‍या काळविटाचा विहीरीत पडून मृत्यु

प्रजापत्र | Saturday, 02/07/2022
बातमी शेअर करा

गेवराई - संपुर्ण जून महिना लोटला तरी गेवराई तालुक्यात पेरण्यायोग्यही पाऊस न झाल्याने वन्य जीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाण्याच्या शोधात भटकंती करत असतांना दोन काळविट विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जळगाव शिवारात शुक्रवारी रात्री घडली. ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

 

 

जवळगाव शिवारात विहीरीत शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास दोन काळविट पडले असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील बाबासाहेब दिगांबर खुणे यांनी वनविभागाचे वन पाल टाकणकर यांना याची माहिती दिली. वन पाल यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाच्या कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांनी दोन्ही काळविटांना विहीरीबाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
 

Advertisement

Advertisement