Advertisement

फडणवीस होणार उपमुख्यमंत्री

प्रजापत्र | Thursday, 30/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करतानाच आपण मंत्रिमंडळात नसू असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र आता फडणवीस शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्वतः पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी तशी घोषणा केली आहे.

 

जेपी नड्डा यांनी बोलताना   नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील सरकारचे अभिनंदन केलं. तसंच यावेळी भाजप सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी लढतो असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेचं भलं करणं हाच आमचा उद्देश असल्याचंही ते म्हटले. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप पूर्णपणे उभी असणार आहे, पण या भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, असं ठरवलं असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य नड्डा यांनी यावेळी केलं. यामुळे आता फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सहभागी होतील

 

यापूर्वी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे मंत्री राहिलेले आहेत, आता मात्र शिंदेंच्या मंत्रिमंडळात फडणवीस मंत्री असतील. यापूर्वी शिवाजीराव निलनेगेकर आणि नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतरही पुन्हा इतरांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते. 
 

Advertisement

Advertisement