मुंबई-एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी धक्कादायक घोषणा गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते राजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, असे फडणवीस म्हणाले.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याच शपधविधी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा