Advertisement

किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

प्रजापत्र | Wednesday, 29/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई :  शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एका लेखी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात घाणेरडे शब्दांचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

 

 

धमकीच्या पत्रासोबत किशोरी पेडणेकर यांचा फोटो असून त्यावर काटछाट मारण्यात आलेल्या आहे. धमकी देणाऱ्याने पत्रावर आपले नाव लिहिले असून या पत्रात अजितदादा यांच्या उल्लेखही केला आहे. तसेच खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हा अजितदादांच्या जीवावर झालेला आहे, असे नमुद करुन आदित्य यांना मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

 

 

दरम्यान, याबाबत किशोरी पेडणकर यांनी माहिती देताना सांगितले की, मला धमकीचे पत्र आले आहे. पत्रासोबत फोटोही माझा होता. त्यावर काटछाट करण्यात आली आहे. खतम असे लिहिण्यात आला आहे. बाळासाहेबांच्या फोटोवर अपशब्द लिहिले आहेत. बंडखोरांच्या फोटोवर दहा 10 लिहिले आहे. तसेच पत्रात घाणेरडे शब्दांचा वापर करण्यात आला आहे. मला मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. सरकार पडू दे, आमच्या अजितदादा च्या जीवावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, असा पत्रात उल्लेख आहे. तर आदित्य ठाकरे यांना रस्त्यावर आणून मारु, अशी या पत्राद्वारे धमकी दिली आहे.

 

 

मी रायगडची संपर्कप्रमुख आहे. पक्ष वाढीसाठी काम करत आहे. मला वाटतंय मुंबईतलाच इथलाच स्थानिक कोणी व्यक्ती असावा. जो उरणच्या नावे दिशाभूल करत असेल. माझ्या जीवावर का उठला आहे हे कळत नाही? सध्याच्या राजकीय उलथा पालथीचा उल्लेख आहे. यापूर्वीही धमकीचे पत्र आले आहे. पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. मी शिवसैनिक आहे या सगळ्या प्रकरणाला तोंड देणार आहे. या पत्रात  चिन्ह फुल्या आहेत, हा अघोरी प्रकार आहे, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
 

Advertisement

Advertisement