गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी तृप्तीपासून तो लवकर विभक्त होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चांबाबत सिद्धार्थ-तृप्तीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. मुलगी स्वराचा वाढदिवस सिद्धार्थ-तृप्तीने एकत्र साजरा केला. सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या फोटोमध्ये तृप्ती देखील त्याच्याबरोबर दिसत आहे. आता सिद्धार्थने आपली मुलगी ईराचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तृप्ती देखील दिसत आहे.
सिद्धार्थचा ‘तमाशा LIVE’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याच चित्रपटासाठी त्याने एक रॅप साँग गायलं आहे. त्याच्या याच रॅप साँगवर ईरा डान्स करताना दिसत आहे. सिद्धार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये टिव्हीवर ‘तमाशा LIVE’मधलं गाणं दिसत आहे. हे गाणं पाहून सिद्धार्थची लेक ईरा डान्स करताना दिसत आहे. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.