Advertisement

अजित पवार, छगन भुजबळांना कोरोना

प्रजापत्र | Monday, 27/06/2022
बातमी शेअर करा

मुंबई-राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वतः अजित पवार व छगन भुजबळ यांनीच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसेच लक्षणं दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करण्याचं आवाहनही केलं.
अजित पवार म्हणाले, “काल मी कोरोनाची चाचणी केली ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.”
छगन भुजबळ म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने करोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. तसेच लक्षणे दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.

 

Advertisement

Advertisement